मलकापूरमहाराष्ट्र

उपजिल्हा रुग्णालयात लेटलतीफ येणाऱ्या डॉ.चा, बंद द्वार अधिक्षक कार्यालय कुलुपाचा पुष्पगुच्छ देऊन शिवसेना (उबाठा)च्या वतीने सत्कार

मलकापूर प्रतिनिधी(शेख निसार ):- आज गांधीगिरी ने सत्कार या पुढे उशीरा आल्यास कार्यालयंच तोडफोडीचा शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांचा इशारा…

मलकापुर:- उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची येण्याची वेळ सकाळी आठ वाजेची असताना डॉक्टर दहा वाजता येत असल्याने बाहेर गावाहून आलेल्या रुग्णांना थंडीत ताटकळत बसावे लागत असल्याने याबाबतची माहिती एका रुग्णाने शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर यांना दिली क्षणाचाही विलंब न करता शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर यांनी सोबत गुलाब पुष्प घेऊन येत लेट येणाऱ्या डॉक्टरांचा गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर दहा वाजूनही उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक कार्यालय उघडले गेले नसल्याने त्या कार्यालयाच्या कुलपाला गुलाब पुष्पगुच्छ देऊन बंदद्वार सत्कार केला तर रुग्णालय अधिक्षकांना भ्रमणध्वनीद्वारे फोन लावून आज गांधीगिरी करतोयं… उद्या डॉ,व आपण ही लेट आल्यास कार्यालयंच तोडफोडीचा इशारा शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदुरा तालुक्यातील ग्राम काटी येथील उमेश गारमोडे नामक रुग्ण सकाळी आठ वाजता उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आला उपजिल्हा रुग्णालयात नाव नोंदणी करून चिठ्ठीही काढली मात्र तब्बल दोन तास डॉक्टर आले नसल्याने त्याला थंडीतच कुडकुळत बसावे लागले यावेळी त्याचे सोबत इतरही दहा ते बारा रुग्ण जमा झाले रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना डॉक्टर केव्हा येणार याबाबत विचारले असता त्यांनी उडवा-उडवीचे उत्तरे दिल्याने गारमोडे यांनी शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांना भ्रमणध्वनी द्वारे फोन लावला व दहा वाजले तरी अजून रुग्णालयात डॉक्टर आले नसल्याने होत असलेल्या रुग्णांच्या हेडसांडीबाबत अवगत केले क्षणाचाही विलंब न लावता गुलाबपुष्प घेवून शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी उपजिल्हा रुग्णालय गाठले पावणेदहा वाजता येणाऱ्या लेटलतीफ डॉ.चा गुलाब पुष्पगुच्छ देवून सत्कार केला,दहा वाजता उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक कार्यालय गाठले तिथे मात्र कुलूप असल्याने कुलूपालाच पुष्पगुच्छ देवून गांधीगिरी करुन रुग्णालय अधीक्षक उंबरकर,प्रभारी रुग्णालय अधीक्षक क्षिरसागर यांना भ्रमणध्वनी द्वारे फोन लावत आपणही लेट येत (बाहेरगावाहून येणे-जाणे करीत ) असल्याने रुग्णालय हे वाऱ्यावर सोडल्यागत झाले असून रुग्णालयात कर्मचारी व डाॅ.च्या कामकाजाच्या वेळेची माहितीचा बोर्ड लावण्यात यावा व रुग्णालय कर्मचारी, डाॅं.नी तसेच अधिक्षकांनी यानंतर वेळेचे बंधन पाळावे न पाळल्यास कार्यालय तोडफोडीचा इशारा ही शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी दिला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button