खानदेशमहाराष्ट्रमुबई

माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय येथील धक्कादायक प्रकार उघड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर

नेरूळ येथील प्रसिद्ध असणाऱ्या मीनाताई ठाकरे रुग्णालय येथे सामान्य नागरिकांना त्रास देण्यात येत आहे. सविस्तर वृत्त असे की की ऐक महिला तिच्या मुलीला घेऊन रुग्णालय आली असता मुलीला ती दाखवायला डॉक्टर कडे नेणार तेवढ्यात तिला उलटी आली असता तिने वॉर्ड समोरच उलटी केली. चार ते पाच वर्षाची ती मुलगी ताप असल्यामुळे तिला लगेच उलटी आली असेल परंतु तेथे उपस्थित सफाई कर्मचारी याने त्या मुलीच्या आई ला कपडा आणून देऊन ते साफ करण्यास सांगितले. सफाई कर्मचारी उपस्थित असताना त्यांनी ते काम करायला पाहिजे होते. परंतु त्यांनी रुग्णाचा आई ला सफाई करायला लावली. यावरून असे लक्षात येते की सामान्य लोकांना तेथे कशी वागणूक देण्यात येते. एवढेच नाही तर एक महिला तिच्या मुलाला घेऊन नंबर प्रमाणे दाखवायला जाणार होती. तिच्या आधी दुसऱ्या महिलेला आधी जाऊ दिले बहुतेक ती ओळखीची असेल म्हणून जेव्हा ती महिला ओरडली की माझा नंबर पहिला होता . तर तिला गप्प बस म्हणून बोलण्यात आले. हा सगळा प्रकार प्रतिनिधी यांच्यासमोर घडून आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button