खानदेशपत्रकारबुलढाणामहाराष्ट्र

तेल्हारा शहरात १७ डिसेंबरला होणार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५५ वा पुण्यस्मरण सोहळा, अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ,मोझरी द्वारा तथा तेल्हारा तालुक्याच्या वतीने आयोजन!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.१४ :- अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम ,मोझरी अंतर्गत तेल्हारा तालुक्याच्या वतीने वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा यावर्षीचा ५५ वा पुण्यस्मरण सोहळा तेल्हारा जि.अकोला (महा.) येथील से.ब. विद्यालयाच्या भव्य प्रांगणात रविवार दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी पार पडणार आहे.
या पुण्यस्मरण सोहळ्याचे चार सत्रामध्ये आयोजन करण्यात आले आहे प्रथम सत्राच्या सुरुवातीला स.०८:०० वा. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची शहरांमधून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे संयोजक सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दादा मोरे असतील, शोभायात्रेनंतर लगेच उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे ,कार्यक्रमाचे उद्घाटन दामोदरजी पाटील गुरुजी (उप सर्वाधिकारी अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी )यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. श्री प्रकाश महाराज वाघ (प्रचार सेवा अधिकारी केंद्रीय प्रचार कार्यालय श्री शेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी) हे असणार आहेत.नगर परिषद तेल्हारा मुख्याधिकारी सतीश गावंडे ,रवींद्र दादा मुंडगावकर (सदस्य केंद्रीय कार्यकारिणी श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम ,मोझरी) ,रामदासजी देशमुख दादा (सदस्य केंद्रीय कार्यकारणी श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम तथा अमरावती विभागीय सेवा अधिकारी),ह.भ.प.सुशील महाराज वणवे (सचिव केंद्रीय प्रचार विभाग समिती गुरुकुंजं) ॲड. वंदनजी कोहाडे (सदस्य केंद्रीय प्रचार विभाग समिती गुरुकुंज आश्रम), शिवाजीराव म्हैसने (अकोला जिल्हा सेवा अधिकारी),शेख गुरुजी (अकोला जिल्हा उपसेवा अधिकारी), ह.भ.प. श्रीकृष्ण महाराज सावळे (अकोला जिल्हा प्रचार प्रमुख), राजेंद्र गाडगे (अकोला जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय युवा संघटक ),ह.भ.प.शुकदास महाराज गाडेकर (गुरुदेव सेवा आश्रम पाटसुल) आदी मान्यवर कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत असणार आहेत.
या सत्रात सत्कार समारंभामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरण पादुका चांदी मध्ये बनवून दिल्याबद्दल रवींद्र दादा मुंडगावकर व सौ. कविताताई रवींद्र मुंडगावकर यांचा सपत्नीक सत्कार व मंचावरील उपस्थित मान्यवरांचा सत्कार या वेळी पार पडणार आहे .
द्वितीय सत्रामध्ये सौ संगीताताई जयंतराव गावंडे (अकोला जिल्हा महिला सेवाधिकारी) यांच्याकडून कार्यक्रमाचे प्रास्ताविक होईल व श्री माणिकराव इंगळे गुरुजी (अमरावती विभागीय सचिव )यांच्याकडून संचालन तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ पद्मावती सुरेशजी कोल्हे (तेल्हारा तालुका महिला सेवा अधिकारी ) यांच्याकडून होईल. तृतीय सत्रामध्ये दु. ०२:०० वा. भजन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सुरेश दादा राहणे (अध्यक्ष तेल्हारा तालुका राष्ट्रीय युवा संघटन ) हे करणार आहेत. ठिक ०४:५८ ला सामूहिक मौन श्रद्धांजली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . चतुर्थ सत्रामध्ये संध्याकाळी ०६:०० वा. सामुदायिक प्रार्थना व ॲड श्री अजितसिंग सेंगर (तेल्हारा तालुका सेवा अधिकारी) यांचा चिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमामध्ये संचालन ॲड.अजितसिंग सेंगर हे करणार असून किर्तन प्रास्ताविक सायं.०७:०० वा. ह.भ.प .श्री विष्णुदास निमकर्डे महाराज (अकोट तालुका प्रचार प्रमुख) हे करतील व सायं. ०७:३० वा. सुप्रसिद्ध ह.भ.प.श्री सुशील महाराज वणवे (सचिव केंद्रीय प्रचार विभाग समिती श्री शेत्र गुरुकुंज आश्रम,मोझरी) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या असून सर्व गुरुदेव सेवकांनी कार्यक्रमाकरिता भगवी टोपी व पांढरा पोशाख धारण करुन उपस्थित रहावे अशी विशेष सूचना याद्वारे करण्यात आली आहे . या सत्रातील कार्यक्रमामध्ये आभार प्रदर्शन सौ पद्मावती कोल्हे (तेल्हारा तालुका महिला सेवाधिकारी) आणि डॉ. प्रीतीताई दीपक राऊत (अकोला जिल्हा महिला प्रचार प्रमुख )यांच्या कडून होईल व शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनेने करण्यात येईल ,अशी माहीती सौ संगीताताई जयंत गावंडे (अकोला जिल्हा महिला सेवधिकारी) यांनी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसला एका पत्रकाद्वारे दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button