खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तेल्हारा तालुक्यात महसूल विभागामार्फत छ. शिवाजी महा. महाराजस्व अभियाना अंतर्गत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” सेवा पंधरवडा अभियान!

तालुक्यातील नागरिकांनी अधिकाधिक संख्येने योजनेचा लाभ घ्यावा; महेश रामगुंडे तहसिलदार तेल्हारा यांचे आवाहन!

महसूल विभागामार्फत शेत/पाणंद रस्त्यांबाबत क्षेत्रीय स्तरावर विशेष मोहिम!

साप्ता. आवाज न्यायाचा
वृत्त संकलन- विजय मनोहर घोडे.
श. प्र. तेल्हारा |

मा.”मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना” अंतर्गत दि. १ सप्टेंबर २०२६ ते ०२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत क्षेत्रीय स्तरावर विशेष अभियान राबवण्यात येत आहे.

राज्यात दि. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा सुलभ व वेळेत उपलब्ध करून देण्याबरोबरच, नागरिकांच्या प्रलंबित महसूल विषयक कामांचा प्राधान्याने निपटारा करून त्यांना जलद व प्रभावी सेवा देण्यावर विशेष भर देण्यात येतो. या अभियाना अंतर्गत यावर्षी दि. १ सप्टेंबर २०२६ ते ०२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “शेत/पाणंद रस्त्यांबाबत” क्षेत्रीय स्तरावर विशेष मोहिम राबविन्यात येत आहे.

दि. ०१ सप्टेंबर २०२६ ते ०२ ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत शेत / पाणंद रस्त्याबाबत क्षेत्रिय स्तरावर विशेष मोहीम रूपरेषा पुढील प्रमाणे.
दि. ०१ ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीमध्ये ग्रामपंचायत स्तरावर प्रचारप्रसिध्दी, जनजागृती व D / E प्रकारातील रस्त्यांची माहीती संकलन (टिप:- D नकाशावर नाही परंतू रस्ता सुरू आहे. E शिव रस्ता) इत्यादी विषयावर कारवाई असेल तसेच या संबंधित जबावदार यंत्रणा म्हणून
ग्रामस्तरीय समिती असेल.

दि. ११ ते १६ सप्टेंबर २०२६
या कालावधीमध्ये गावांची शिवारफेरी व प्रत्येक ग्रामपंचायतीमधून दोन रस्त्यांची निवड सदर दोन रस्त्यांपैकी किमान एक रस्ता हा अडी – अडचणीचा अथवा अति- ताडीचा असावा या संदर्भात कारवाई असेल. व या संदर्भामध्ये जबाबदार यंत्रणा म्हणून ग्राम महसूल असेल.

दि.१७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६
या कालावधीमध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत सिमांकन व अतिक्रमण असल्यास अतिक्रमणमुक्त करण्याची कार्यवाही असेल व यामध्ये जबाबदार यंत्रणा म्हणून अधिकारी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सरपंच, पोलीस पाटील, तहसिलदार व उप अधिक्षक भूमी अभिलेख हे असतील. तर दि.२३ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोंबर २०२६ या कालावधीमध्ये विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची बैठक व रस्त्यांना मान्यता देण्याच्या विषयावर कार्यवाही राहणार असून या संबंधित विषयावर जबाबदार यंत्रणा म्हणून विधानसभा क्षेत्र समिती असेल.
तसेच दि.०१ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोंबर २०२६ या कालावधीमध्ये योजनेची व्यापक प्रचारप्रसिध्दी व वेबपोर्टलवर /अभिप्राय / सुचना, नोंदणी इत्यादी विषयावर कारवाई असेल तर या संबंधित जबाबदार यंत्रणा म्हणून सर्व संबंधीत यंत्रणा राहतील.

नमूद वेळापत्रकानुसार दि.०१ सप्टेंबर २०२६ ते ०२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत “शेत/पाणंद रस्त्यांबाबत” क्षेत्रीय स्तरावर विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. तरी तेल्हारा तालुक्यातील नागरिकांनी मा. “मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनाचा” अधिकाधिक संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन तेल्हारा येथील कर्तव्यदक्ष तहसिलदार तथा दंडाधिकारी महेश रामगुंडे यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button