रावेर विधानसभा भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार श्री.अमोल हरिभाऊ जावळे यांचा “नामनिर्देशन अर्ज” भाजपा नेते श्री.गिरीषजी महाजन व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल…

“महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024” अनुषंगाने रावेर लोकसभा अंतर्गत रावेर विधानसभा साठी “भाजपा व महायुती” चे अधिकृत उमेदवार श्री.अमोल हरिभाऊ जावळे यांनी आज भाजपा नेते श्री.गिरीषजी महाजन व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, म.प्र.माजी मंत्री आ.श्रीमती अर्चना चिटणीस तसेच जिल्ह्यातील भाजपा व महायुती चे प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थित आपला “नामनिर्देशन अर्ज” तहसिल कार्यालय, रावेर येथे सादर केला.
यावेळी भाजपा नेते श्री.गिरीषजी महाजन, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, म.प्र.माजी मंत्री आ.श्रीमती अर्चना चिटणीस तसेच जिल्ह्यातील भाजपा व महायुती पदाधिकारी यांनी “भव्य विजय संकल्प रॅली” मध्ये सहभागी होऊन, सभेमध्ये उपस्थित जनसागरास संबोधुन प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी महायुती उमेदवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी, प्रत्येक बुथवर जास्तीतजास्त मतदानसाठी प्रयत्न करण्याचे यावेळी आवाहन केले.



