खानदेशमहाराष्ट्रराजकीय

बोदवड नगरपंचायतीवर महिला राज

शिवसेनेच्या मिरा माळी यांची बिनविरोध निवड

बोदवड । प्रतिनिधी ।

गेल्या २१ डिसेंबर २०२१ रोजी नगरपंचायतीची निवडणूक झाली होती. त्यात शिवसेना १२, भाजपा ४, राष्ट्रवादी शरद पवार गट १ असे एकूण १७ नगरसेवक आहे. तत्कालिन नगराध्यक्ष आनंदा पाटील यांनी ५ डिसेंबर रोजी राजीनामा दिल्याने नगराध्यक्ष निवडणूक कार्यक्रम लागला होता. १६ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्यात आला. त्यात मिरा दिनेश माळी यांचा एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी आ.चंद्रकांत पाटील यांनी नवनियुक्त नगराध्यक्ष मिरा माळी यांचा सत्कार केला.

निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे भाजपाचे नगरसेवक, कार्यकर्ते तसेच

+

शिवसेनेचे नगरसेवक, कार्यकर्ते यांचे आभार मानले. यावेळी गटनेता आनंदा पाटील, सईद बागवान, संजय गायकवाड, हर्षल बडगुजर, सुनील बोरसे, राजेश नानवानी, हकीम बागवान, गोलु बरडीया, लतीफ शेख, निलेश माळी, मुजमिल शहा, देवेंद्र खेवलकर, जीवन जाट, युवराज माळी, किशोर माळी, पवन माळी, रामधन माळी, महेश माळी, कलीम शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, सहाय्यक म्हणून नगरपंचायत मुख्याधिकारी सतिष पुदाके यांनी काम पाहिले. उमेदवारी अर्ज एकच दाखल झाला असून छाननीअंती अधिकृत बिनविरोध निवडीची घोषणा २२ डिसेंबर रोजी केली जाईल, अशी माहिती मिळाली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button