आज शेख फातिमा माई ची जयंतीस्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

फातिमा शेख यांचा जन्म 9 जानेवारी 1831 पुणे महाराष्ट्र भारतीय पेशा शिक्षिका समाज सुधारक ख्याती पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षकांपैकी एक धर्म इस्लाम नातेवाईक मीय्या उस्मान शेख,
फातिमा शेख या एक भारतीय शिक्षण तज्ञ आणि समाज सुधारक होत्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्या सहकारी होत्या शेख आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका पैकी एक असून त्यांनी फुले यांच्या शाळेत दलित मुलांना शिक्षण देण्याचे काम केले,
मियां उस्मान शेख या त्यांच्या भावाच्या घरी ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी वास्तव्य केले होते. फातिमा शेख यांच्या सह ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी दलित समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याची जबाबदारी घेतली.
अमेरिकन मिशनरी सिंथिया फरारकडून चालवल्या जाणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांची भेट सावित्रीबाई फुलें शी झाली. फुलेंनी स्थापन केलेल्या पाच ही शाळां मध्ये त्यांनी शिकवले. तसेच त्यांनी सर्व धर्म आणि सर्व जातीच्या मुलांना शिकवले. १८५१ मध्ये मुंबईत दोन शाळांच्या स्थापनेत शेख यांनी भाग घेतला.



