बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तान्हा पोळा उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांनी साकारली शेतकरी भूमिका; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले नगर परिषद मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सहभागातून पारंपरिक तान्हा पोळा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी शेतकरी, बैल व ग्रामीण जीवनाशी संबंधित विविध भूमिका साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून शेतकऱ्यांच्या कष्टांची आणि शेतीमध्ये बैलांचे असलेले महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

बैलपोळा हा शेतकरी व बैलांमधील ऋणानुबंध जपणारा पारंपरिक सण आहे. या सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे आणि आपल्या संस्कृतीशी त्यांची नाळ अधिक घट्ट व्हावी, या उद्देशाने शाळेत देऊळगाव राजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचा मार्गदर्शनात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत शेतकरी भूमिका साकारत शेतीप्रधान जीवनाचे चित्र उभे केले. अभिनय,संवाद आणि सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचे कष्ट,शेतीचे महत्त्व आणि ग्रामीण संस्कृतीची वैशिष्ट्ये प्रभावीपणे मांडली.

यावेळी विद्यार्थ्यांनी “निसर्गाचे रक्षण करा”, “झाडे लावा, झाडे जगवा” पर्यावरणाचे रक्षण करा,प्राणीमात्रांवर दया करा,अशा विविध सामाजिक व पर्यावरणपूरक संदेशांच्या माध्यमातून जनजागृती केली. वृक्षसंवर्धन, पर्यावरणाचे रक्षण आणि निसर्गाशी असलेले नाते जपण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
पारंपरिक सणाच्या माध्यमातून संस्कृतीचे जतन, शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता आणि पर्यावरण संवर्धन या तीनही बाबींचा सुंदर संगम या उपक्रमातून साधण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विविध भूमिका सादरीकरणामुळे शाळेतील वातावरण आनंदमय झाले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, अभिनयकौशल्याला आणि सामाजिक जाणिवेला चालना मिळाली.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सर्व सदस्य पालक तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.शाळेच्या या उपक्रमाचे पालक व नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. परंपरेचे जतन, पर्यावरणाचे संवर्धन आणि प्राणीमात्रांप्रती प्रेम याचा सुंदर संगम या तान्हा पोळा उत्सवातून पाहायला मिळाला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button