महाराष्ट्र

रावेर तालुक्यातील अजनाड येथील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व कर्ज सुविधा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींवर कारवाई करण्यात यावीएकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत मागणी

नागपूर –
रावेर तालुक्यातील अजनाड येथील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व कर्ज सुविधा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आ.
एकनाथराव खडसे यांनी
तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषदेत केली यावेळी ते म्हणाले रावेर तालुक्यातील
अजनाड येथील महिला बचत गटाची रक्कम व्यक्तिगत फायद्यासाठी वापरून सुमारे ९० लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याची बाब दिनांक २२ ऑगस्ट, २०२५ च्या सुमारास निदर्शनास आली आहे
जळगाव जिल्ह्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी प्रशासनाने आतापर्यंत काय चौकशी केली तसेच चौकशीत काय आढळून आले त्याची माहिती द्यावी तसेच चौकशीच्या अनुषंगाने लाखो रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या संबंधितांविरुध्द कठोर कारवाई करण्याच्याची मागणी आ एकनाथराव खडसे यांनी केली

सदर प्रश्नाला मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले ते म्हणाले
अजनाड ता.रावेर, जि. जळगाव येथील महिला बचत गटाची रक्कम व्यक्तिगत फायद्यासाठी वापरून सुमारे ९० लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोलीस ठाणे, रावेर येथे भारतीय न्यायसंहीता कलम ३१८(४), ३१६(२) अन्वये दिनांक २०/०८/२०२५ रोजी गुन्हा क्र. ३४८/२०२५ दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एक आरोपी निष्पन्न झालेला असून सदर आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. सदर आरोपीचा अटकपूर्व जामिन मा. न्यायालयाने नामंजूर केला आहे. पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या दिनांक १९/०९/२०२५ च्या आदेशान्वये सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, जळगांव यांच्याकडे वर्ग करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button