महाराष्ट्र

अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उपस्थित जनसमुदाय, संबोधित करताना अॅड. प्रकाश आंबेडकर.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर

अमरावती : कॉंग्रेससह इतर सर्वच महाविकास
आघाडीतील नेत्यांच्या मानगुटीवर कारवाईची तलवार लटकून आहे. त्यामुळे जर भीत-भीत निवडणुकीला सामोरे जाल तर सर्वांच्याच मानगुटीवर तलवार कोसळेल आणि सर्वच जेलमध्ये जातील. ‘वंचित’चा एकही नेता जेलमध्ये जाणार नाही, त्यामुळे युतीमध्ये लढाल तरच टिकाल अन्यथा सर्वच जेलमध्ये जाल, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी जाहीर सभेमध्ये व्यक्त केली.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने येथील सायन्सस्कोर मैदानावर लोकशाही गौरव महासभा पार पडली. यावेळी प्रकाश आंबेडकरांचे विचार ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक एकवटले होते. अॅड. प्रकाश

आंबेडकर म्हणाले, दोन वर्षापासून महाविकास आघाडीत लोकसभेच्या ४८ जागा वाटपासंदर्भातील समझोता झालेला नाही. त्यामुळे खरच यांना भाजपला हरवायचे आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. ते म्हणतात वंचितला आम्ही दोन जागा देतो, त्यामुळे त्या आगा कोणत्या यासंदर्भात जेव्हा कॉंग्रेसवाल्यांना विचारणा केली तर म्हणतात, अजून आमचं ठरल नसल्याचे सांगतात. त्यामुळे जर भाजपला हरवायचा असेल तर युतीमध्ये तुम्हाला लढाव लागेल. देशात राजकीय पक्ष टिकले पाहिजे, राजकीय पक्षच राहिले नाही तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल. आम्ही कधीही सत्तेत नव्हतो, त्यामुळे चोरी करण्याचा प्रश्न नाही, जे सत्तेत होते त्यांना जेलमध्ये जाण्याची भीती आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका आटोपताच सत्ता भोगणाऱ्यांना

सर्वांनाच जेलमध्ये जावे लागेल, युती करायची नाही म्हणून ते बळीचा बकरा शोधत आहे. परंतु ज्या प्रकारे गरीब मराठ्यांचा उपयोग केला त्या प्रकारे ‘वंचित’चा वापर करण्याचा विचार असेल तर भाजपसोबत तुम्हालाही गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीतील नेत्यांना दिला. या विराट सभेला मंचावर प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर, प्रवक्ते राजेंद्र पातोडे, अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संगीता अढाऊ, डॉ. निशा शेंडे, प्रा. शैलेश गवई, मुफ्ती वसीम काझी, मौलाना मो. बशीर, अख्थती सिरसाट, माजी मंत्री रमेश गजभिये, पुंडलिकराव वाड, डॉ. गजाला खान, सिद्धार्थ भोजने, सुरेश तायडे, विवेक वाकोडे, संजीवन खंडारे, नंदू वानखडे, अंकुश वाकपांजर, अभिजित देशमुख आदी उपस्थित होते.

…तर कापसाला प्रतिक्विंटल पाचशे रुपये बोनस

वंजित बहुजन आघाडीच्या हाती सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या कापसाला पूर्वीप्रमाणेच प्रतिक्चिटल पाचशे रुपये बोनस दिला जाईल, अशी ग्वाही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सत्ताधारी लुटारू असून, हे थांबले पाहिजे. राज्यात ६२ हजार शाळा बंद करण्याचा निर्णय झाला असून, येत्या काळात त्या खासगी लोकांच्या घशात ओतल्या जातील. त्यामुळे सरकार कोणाचे असावे, हे मतदारांनी ठरवावे. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली, राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पातविलेल्या अहवालात वृट्या असल्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा गुंता कायम आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button