खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरशैक्षणिक

सायबर सुरक्षेचे धडे विद्यार्थ्यांपर्यंत; मुक्ताईनगरात जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जे.ई. स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मुक्ताईनगर येथे इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती विषयावरील विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. विकास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील विद्यार्थिनी प्रांजल मराठेभाग्यश्री बढे यांनी Quick Heal Foundationच्या Cyber Warrior उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, ओटीपी व पासवर्ड सुरक्षितता, सोशल मीडियाचा जबाबदारीने व सुरक्षित वापर तसेच विविध सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. संवादात्मक पद्धतीने झालेल्या या सत्रात विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारत सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या शेवटी मा. कणखरे सर यांनी मार्गदर्शकांचे आभार मानून विद्यार्थ्यांनी डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहण्याचे व सायबर सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले.

विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता आणि सुरक्षित इंटरनेट वापराबाबत जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button