नगराध्यक्षा सौ.माधुरीताई तुषार शिपने यांनी सध्या सुरू असलेले;SIR मतदान प्रक्रियेसाठी सर्व मतदार भगिनी/बांधवांना आव्हान केले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी;– शंकर शिवरकर
देऊळगाव राजा;भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) अंतर्गत येत्या दोन ते तीन दिवसांत आपल्या गावात / परिसरात BLO (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) यांच्या मार्फत SIR फॉर्म वाटप करण्यात येणार आहे.
त्यामुळे सर्व मतदारांनी खालील आवश्यक कागदपत्रे व माहिती आधीपासून तयार ठेवावी, जेणेकरून फॉर्म भरताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.
आवश्यक कागदपत्रे
१) आधार कार्ड
२) मतदार ओळखपत्र (Voter ID Card)
३) चालू मोबाईल क्रमांक
४) कलर पासपोर्ट २ फोटो
विशेष सूचना : SIR फॉर्मवर कलर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आवश्यक आहेत. जर आपल्या जवळ सध्या फोटो उपलब्ध नसतील, तर कृपया आजच फोटो काढून तयार ठेवावेत, जेणेकरून फॉर्म भरताना विलंब होणार नाही
सर्व मतदारांनी BLO यांना सहकार्य करावे व आपल्या कुटुंबातील तसेच शेजारील मतदारांनाही ही माहिती कळवावी. असा आव्हान नगरपरिषद नगराध्यक्षा माधुरीताई शिपने यांनी केले



