बुलढाणामहाराष्ट्र

टीईटी-नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ युवक काँग्रेस आक्रमक

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली: तालुखा: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

विद्यार्थी आणि शिक्षकांचे भवितव्य भाजप सरकारने उद्ध्वस्त केले  :  शिवराज पाटील

बुलढाणा: देशातील सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारी नीट पेपरफुटी आणि त्यानंतर टीईटी परीक्षा रद्द होणे ही भाजप सरकारच्या शिक्षण व्यवस्थेच्या पूर्ण अपयशाची साक्ष आहे. भाजपच्या कार्यकाळात पेपरफुटीचे सत्र सातत्याने सुरू असून सरकार मात्र पेपर माफियांना पाठीशी घालण्याचे पाप करत आहे. विद्यार्थ्यांच्या कष्टांची, शिक्षकांच्या विश्वासाची आणि शिक्षण व्यवस्थेच्या प्रतिष्ठेची सरकारला कोणतीही चिंता उरलेली नाही. भाजप सरकारनेच विद्यार्थी आणि शिक्षकांचे भवितव्य उद्ध्वस्त केले, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव शिवराज पाटील यांनी केली.

देशभर गाजलेल्या नीट आणि महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सोमवार २९ जून रोजी बुलढाणा येथे आक्रमक आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. युवक काँग्रेसच्या वतीने  जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी
‘देश का पीएम वीक है… तभी तो पेपर लीक है…’, ‘पेपर चोर… गद्दी छोड़…’  छात्रों के सन्मान में… काँग्रेस मैदान में! राजीनामा द्या, राजीनामा द्या… दादा भुसे, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या! ‘युवक काँग्रेस… जिंदाबाद’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

केंद्रातील आणि राज्यातील शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना तात्काळ बडतर्फ करावे.

तसेच पेपरफुटीप्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक कायदे व प्रभावी यंत्रणा ✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button