बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

चंद्रलोक सोसायटीमध्ये घरफोडी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव : स्थानिक चंद्रलोक सोसायटी मधील रहिवासी अजय राजवैद्य यांचे घराचे कुलूप तोडून घरातील ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दि. २३ ते २४ ऑक्टोबरच्या रात्री दरम्यान घडली. याप्रकरणी दोन महिन्यानंतर तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रलोक सोसायटीत राहणार अजय रामचंद्र राजवैदय वय ५४ वर्ष हे २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी परिवारासह बाहेरगावी गेले होते. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता घरी परतले असता त्यांनी घराचे कुलूप तोडलेले दिसले तर घरात प्रवेश केला असता घरातील पूर्णतः सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील दोन लॅपटॉप, मोबाइल, १ घड्याळ, चांदीचे दागिणे व इतर साहित्य असा एकुण ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे दिसून आले. दरम्यान राजवैद्य यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button