नविन पनवेल शहरात रविवारी सकल मराठा समाजाचा वधु-वर, पालक परिचय मेळावा

नविन पनवेल शहरात रविवारी सकल मराठा समाजाचा वधु-वर, पालक परिचय मेळावा
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

पनवेल (विशेष प्रतिनिधी) – नविन पनवेल येथे रविवारी (दि.२७) सकाळी १० वाजता सकल मराठा समाजाचा मराठा वधु-वर ,थेट-भेट व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राज्यभरातून रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, नवी मुंबई, मुंबई,पुणे व इतर जिल्ह्यातून सुमारे शेकडो वधू-वर व त्यांचे पालक येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

शहरातील कर्नाटक संघ पनवेल,प्लाॅट नं.२९, सेक्टर २, नविन पनवेल येथे हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्याचे आयोजन सकल मराठा सोयरीक ग्रृपच्या राज्याध्यक्षा,शिवमती मायाताई दत्तात्रय जगताप पाटील,जिजाऊ ब्रिगेड अंतरराष्ट्रीय उपाध्यक्षा शिवमती संपुर्णाताई सावंत,शिवमती आयोध्याताई जगताप यांनी सगेसोयरे वधु-वर सेवा केंद्र, सकल मराठा सोयरीक ग्रृपच्या माध्यमातून या मेळाव्याचे आयोजन केले असून, शिवश्री हरीभाऊ जगताप पाटील सर्व सहकार्यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्वदूर संपर्क दौरा केला आहे. पाहणी संपर्क परिचयातून मेळाव्यातच २० ते २५ विवाह मार्गी कसे लागतील, यासाठीसुध्दा आयोजकांचा प्रयत्न असणार आहे.
या शिवाय, या मेळाव्यात विवाहासाठी समुपदेशन, वधु-वर परिचय, विवाह संस्कार महत्त्व, उपवर मुले मुली व संबंधित पालकांना समुपदेशन, विवाहात येणारी अडथळे, विवाह समस्यांवर मार्गदर्शन, उपवर मुले, मुली यांना विवाह ठरवताना घ्यावयाची काळजी व त्यावर मार्गदर्शन तसेच अविवाहित, घटस्फोटीत, विधवा, विधुर यांच्यासाठी स्थळे उपलब्ध असून, विवाह पूर्व व विवाहोत्तर येणाऱ्या समस्यांवर पालक कुटुंबीयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी शिवश्री. शहाजीराजे भोसले,संस्थापक अध्यक्ष ई एम पाॅवर ग्रुप रायगड जिल्हा, प्राचार्य हनुमंत चव्हाण, शिवमती, रेवती कदम



