बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग तपासणी शिबिर रद्द

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा दि.15 : जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे नियमितपणे दर शुक्रवारी नेत्र, मतिमंद/मनोविकार तसेच कान-नाक-घसा संबंधित दिव्यांग तपासणी करण्यात येते. मात्र, स्थानिक सुट्टी असल्यामुळे दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी होणारे दिव्यांग तपासणी शिबिर रद्द करण्यात आले आहे.
या दिवशी नागरिकांनी दिव्यांग तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिर रद्द असल्याची माहिती न मिळाल्याने नागरिकांना रुग्णालयात आल्यानंतर होणाऱ्या गैरसोयीस प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय बुलढाणा यांनी कळविले आहे.



