
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वातंत्र्यदिनी मुलांना खाऊचे वाटप……
.(जी.डी.रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी)
भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्थानिक मेन रोड वरील जुना धान्य बाजार चौकात मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमात सकाळी ७.३० ते १० वाजेपर्यंत मुलांना बिस्किट व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. यावेळी देशभक्तीपर गीते लावून तिरंगा ध्वज फडकावत स्वातंत्र्यादिनाचा आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष शरद वसतकार, बाजार समिती उपसभापती संघपाल जाधव, सेवक समिती सभापती राजेश हेलोडे, नितीन शर्मा, गोकुल बुंदेले, आसिफ अहमद, सय्यद इरफान, मोहम्मद अदनान भाई, गुरुदीपसिंग सुमल, रिंकू भैय्या पोपली, योगेश तंबोले, शेख राजवीर, दीपक महाजन, माजी सैनिक ए. के. इंगळे, माजी सैनिक डी. आर. तायडे, डी. एन. इंगळे, शेख लुकमान, सुमित छापरवाल, करण छापरवाल, गगन वानखेडे, सनी पंजवाणी, माजिद खान, हर्षवर्धन खंडारे, संतोष जाधव, संदेश अवसरमोल, अमन हेलोडे, विशाल तायडे उपस्थित होते……



