खानदेशमलकापूर

न.प.च्या जन्ममृत्यू विभागाकडून नागरिकांची होत असलेली आर्थिक लूट, मानसिक, शारीरीक त्रास बंद करा अन्यथा आंदोलनाचा शिवसेना (उ.बा.ठा) चा इशारा

शिवसेना( उ.बा.ठा) चे तहसीलदार तथा न.प मुख्य प्रशासक यांना निवेदन

मलकापुर प्रतिनिधी ( शेख निसार):- नगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागाकडून जन्म, मृत्यू प्रमाणपत्र दुरुस्तीसाठी आर्थिक,मानसिक,शारीरिक लूट केल्या जात आहे हि सामान्य जनतेची लूट तात्काळ थांबवा, दाखल्यांसाठी आलेल्या नागरिकांना, महिलांना न.प.चे कर्मचारी उन्हातानहात चार-चार तास ताटकळत उभे ठेवतात…साधी बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न.प.ने केलेली नसल्याने खिडकीबाहेर चोंरासारखे उभे राहवे लागत असल्याने नागरिकांमध्ये त्रिव नाराजी व्यक्त होत आहे,जन्म मृत्यू प्रमाणपत्रावरील दुरुस्तीसाठी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर ॲफेडेव्हिट करून आणा असे फर्मान सोडून तसेच वेळेच्या आत मध्ये न देता चिरीमिरी घेऊन राजकीय वरदस्त असणाऱ्या प्रमाणपत्र त्वरित देण्यात आहे ही सामान्य जनतेची आर्थिक लुट असून ही लूट तात्काळ थांबवून स्टॅम्पची सक्ती न करता विस रुपयाचे तिकिट लावून ॲफेडेव्हिट ग्राह्य धरुन प्रमाणपत्रावरील दुरुस्ती करण्यात यावी तसेच व्हिझा, पासपोर्ट आदिंसाठी लागणारा जन्माचा दाखला मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत दिल्या जावा अन्यथा शिवसेना (उ.बा.ठा) च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, उपशहर प्रमुख शे. समद कुरेशी, कामगार सेना शहरप्रमुख हरिदास गणबास,किसान सेना शहर प्रमुख सै.वसीम सै. रहीम, युवा सेना तालुकाप्रमुख पवन गरुड, माजी नगरसेवक पांडुरंग चिम,माजी नगरसेवक रवींद्र गव्हाळे, विश्वनाथ पुरकर, चाॅंद चव्हाण, शांताराम धाडे,राजा कुरेशी,मो.ईसाक तेली,मो.ईक्बाल,शे.मुस्ताक जमादार सह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button