जळगावा जिल्हामहाराष्ट्र

जळगांव येथून तिरुपती, इंदौर व अहमदाबाद विमानसेवा चालू करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतली नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. राम मोहन नायडू यांची भेट…

मुंबई व पुणे विमानसेवेची प्रवाश्यांच्या सोयीनुसार सकाळ व संध्याकाळ वेळ करावी ही मागणी केली.

नवी दिल्ली येथे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. राम मोहन नायडू किंजरापू यांची भेट घेऊन, जळगांव विमानतळ येथून लवकरात लवकर “तिरुपती, इंदौर व अहमदाबाद” साठी विमानसेवा चालू करणे बाबत मागणी केली.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मागणी करतांना असे सांगितले की, जळगांव विमानतळ येथे आयएफआर-ऑल वेदर ऑपरेशन, लॉ व्हिजीबिलिटी व नाईट लँण्डींग अश्या स्थानिक विमान वाहतुकीसाठी आवश्यक सर्व सुविधांनी परिपूर्ण असून, जळगांव विमानतळ येथून सध्या स्थितीत मुंबई व पुणे साठी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरु आहे. परंतु येथून प्रवास करणारे व्यापारी व नागरिकांच्या मागणीनुसार त्यांच्या सोयीसाठी तसेच परिसरातील अधिकचे प्रवासी आकर्षित करण्यासाठी पुणे साठी संध्याकाळी व मुंबई साठी सकाळी दररोज विमानसेवा चालू करण्यात यावी.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केलेल्या मागणीस केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री श्री. राम मोहन नायडू किंजरापू यांनी सकारात्मक पणे घेऊन लवकरच केलेल्या दोन्ही मागणीवर कार्यवाही करणेबाबत आश्वासन दिले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button