बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

उद्या जनुना येथे श्री रेणुका माता यात्रा महोत्सव.

… (जीडी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी)खामगाव प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व जनुना वासियांचे कुलदैवत असलेल्या श्री रेणुका मातेचा यात्रा महोत्सव उद्या ६ एप्रिल हनुमान जयंतीला पार पडणार आहे. या महोत्सवामध्ये बैलगाडी ओढून नवस फेडण्याची २५० वर्षापूर्वीची परंपरा आजही कायम आहे. विशेष म्हणून यावेळी पोळी भाजीचा महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.जनुना नजिक असलेल्या टेकडीवर श्री रेणुका देवीचे भव्य मंदिर आहे. येथे दरवर्षी नवरात्र उत्सव व हनुमान जयंतीला धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते. यावेळीही हनुमान जयंतीदिनी भव्य यात्रा महोत्सव पार पडणार आहे. यात्रेला खामगाव शहरासह पंचक्रोशीतील भावीक मोठ्या प्रमाणात येतात. दर पहाटे मातेची आघोळ घालून विधीवत पूजा अर्जा व आरती करण्यात येते व नंतर मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागते. संध्याकाळी परंपरागत शिखर काठीचा मान असणाऱ्या गणपत गुरेकर यांच्या घरुन शिखर काठीची डफड्याच्या तालावर संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर शिखर काठी मातेच्या दर्शनासाठी मंदिरावर नेण्यात येते. मगदी लांबपताका व मोरपंख बांधलेली शिखरकाठी बैलगाड्या बांधून डफड्याच्या तालावर ७ गडीगळांनी बैलगाडीला गळ बांधून संपूर्ण टेकळीला मनोभावे फेरी मारली जाते. या यात्रेत भाविकांकडून रेणुका माता की जय हा जल्लोष केल्या जातो. तसेच पोळी भाजीच्या महाप्रसादाचे वितरणही केल्या जाते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button