मुक्ताईनगर आगाराच्या बसचा निमखेडी खु! गावाजवळ अपघात 10 जखमी

मुक्ताईनगर प्रतिनिधी :- प्रमोद सौंदाडे
जामनेर येथून मुक्ताईनगर कडे ८ प्रवासी घेवून येत असताना निमखेडी खुर्द फाट्याजवळ नर्सरी जवळ बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळल्याने बसमधील सर्व प्रवासी जखमी तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना दि.५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ७:३० वाजेच्या दरम्यान घडली.
दरम्यान सविस्तर वृत्त असे की, मुक्ताईनगर आगाराची बस क्र MH 19 8711वरील चालक सुनिल दामोदरे, वाहक वाय एफ तांबे हे जामनेर येथून मुक्ताईनगर कडे ८ प्रवासी घेवून येत असताना निमखेडी खुर्द फाट्याजवळ नर्सरी जवळ बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात बसमधील सर्व प्रवासी जखमी तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
सदरील घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी लागलीच रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करून दिल्या आमदार पाटील हे स्वतः कार्यकर्त्यांसह सरकारी दवाखान्यात दाखल झाले होते तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते तसेच आमदारांनी जागेवर तात्काळ आर्थिक मदत एसटी महामंडळाला करण्यास सांगितले तसेच दहा पैकी दोन चालक आणि वाहक आहेत आणि आठ प्रवासी आहे त्या सर्व जखमींना उपचारासाठी लागणारा खर्च महामंडळाने करावा असा आदेश देखील त्यांनी दिला.
जखमींमध्ये आरती सुनील अवतारे, चंद्रकांत जगन अवतारे, प्रमिलाबाई रवींद्र पाटील, आसमा बानू शेख महबूब, सुधाकर शंकर सुरवाडे, प्रेमदास रामदास बोदडे सर्व राहणार मुक्ताईनगर तसेच प्रदीप हिम्मतराव पाटील (उचंदा) अंकित बिस्मिल्ला पिंजारी (पिंपरी – अकराऊत), तसेच हे चालक सुनील श्रीराम दामोदर राहणार इच्छापुर निमखेडी बु! तालुका मुक्ताईनगर व वाहक वाय एफ तांबे राहणार भुसावळ हे जखमी झालेले आहेत. यावेळी मुक्ताईनगर आगाराचे व्यवस्थापक निलेश कलाल म्हणाले की सर्व जखमींना महामंडळातर्फे आर्थिक मदत करण्यात येईल सध्या त्यांना तात्काळ जागेवर आर्थिक मदत केलेली आहे सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही.
जखमींपैकी सहा जणांना जळगाव येथे हलवण्यात आले असून मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रवाशांवर उपचार करण्यात आले. याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची गर्दी जमली तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकारी यांनी येऊन जखमींचे विचारपूस केली.



