ग्रामरोजगार सहाय्यक संग्रामपूर तालुका संघटनेच्या वतीने शासनाच्या ज्याचक अटींची होळी!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,
रतन भगत.
संग्रामपूर दि.२६/९/२६ सविस्तर वृत्त असे की संग्रामपूर तालुका ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने ग्रामरोजगार सहायकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच ग्रामरोजगार सहाय्यकांवर लागण्यात आलेल्या ज्याचक अटींच्या शासन निर्णयाची होळी करून संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्याचा समावेश शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला नसून त्या ऐवजी ग्राम रोजगार सहाय्यकांसाठी विविध जाचक अटींचा समावेश करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यामध्ये मनरेगा नियोजनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मनुष्य दिवस निर्माण करण्याची जबाबदारी 11 महिन्यांची निवड प्रक्रिया तसेच कामांच्या संदर्भात ग्रामरोजगार सहायकांना कार्यमुक्त करण्यासंदर्भातील तरतुदींचा समावेश असल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. ग्राम रोजगार सहाय्यक मागील अनेक वर्षापासून मनरेगा योजनांच्या अंमलबजावणी ग्राम पातळीवर महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. काम करताना त्यांना विविध अडचणींना सामना करावा लागत असून लाभार्थ्यांची केवायसी करणे बँक खाते व आधार अपडेट करून घेणे तसेच विविध कामांच्या मस्टर साठी तालुकास्तरावर वारंवार ये जा करणे यासारखी कामे करावे लागतात. या सर्व जबाबदाऱ्यांच्या तुलनेत मिळणारे मानधन अत्यंत कमी असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
तसेच ३ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानंतर जवळपास २३-२४ मैने उठूनही ग्राम रोजगार सहायतांना अपेक्षित असे मानधन लागू करण्यात आलेले नाही असा दावा संघटनेने केला आहे. प्रलंबित मागण्यांवर निर्णय घेणे ऐवजी नवीन ज्याच्या कटींचा शासन निर्णय काढण्यात आल्याने ग्रामरोजगार सहायकांमध्ये तीव्र अशा प्रकारचे नाराजी निर्माण झाली आहे. यावेळी संघटनेच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील गटविकास अधिकारी माधव जी पायल तसेच कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ज्याचक अटी तात्काळ रद्द करून ग्रामरोजगार सहायकांच्या प्रलंबित मागण्यांचा समावेश असलेला नवीन शासन निर्णय लागू करावा अशी मागणी करण्यात आली. मागण्यांबाबत शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास दिनांक २ ऑक्टोंबर पासून मनरेगा नियोजनाच्या कामावर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्या नावाने सुरू असलेल्या मनरेगा योजनेची ग्रामपातळीवरील अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे असे मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष राहुल मेटांगे उपाध्यक्ष सुरज परघरमोर सचिव गजानन बामणे यांच्यासह रोजगार सहाय्यक देविदास शिंदे ,संतोष वानखडे, विनोद उमरकर ,संतोष गवांदे ,शेषराव वानखडे, रमेश इंगळे ,भानुदास रावणकार ,अक्षय गायकवाड, रामधन खंडेराव ,शाकीर सुरतने ,देविदास आगरकर ,अर्जुन ढगे, बाबुराव तायडे, विनोद उमाळे ,श्रीकांत दाने ,पांडुरंग खारोडे, रोशन भोजने शेख इजाज देविदास मेहंगे बाबुराव बोदडे, ज्ञानेश्वर सोळंके, गौतम इंगळे, नारायण वानखडे ,सुभाष वानखडे, संतोष बोरसे, विजय येऊल ,सचिन भोजने, मिलिंद सोनवणे, शेख अहमद, जीवन वाकोडे, शिवहरी डोसे ,विलास गव्हांदे, विनोद जाधव यांच्यासह तालुक्यातील रोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने निवेदन देतेवेळी उपस्थित होते.



