गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे महापरिनिर्वाण दिन साजरा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी
दरवर्षी सहा डिसेंबर हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुण्यतिथी दिवस म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेबांची पुण्यतिथी देशभरात महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते.
याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे 6/12/2023 रोजी बाबासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील प्रा.हेमंत इंगळे (अधिष्ठाता) डॉ. ईश्वर जाधव (रजिस्ट्रार) महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
त्यानंतर महाविद्यालयातील प्रा. प्रशांत शिंपी, प्रा. वेलचंद होले, डॉ. सरोज भोळे व प्रा. शफिकुर रहमान यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माहिती तसेच त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख व महापरिनिर्वाण दिन याबद्दल माहिती सांगितली.
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त संबोधित केले. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितले की संविधान निर्माता डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे थोर समाज सुधारक आणि तसेच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जातिवाद दूर करण्यासाठी तसेच गरीब दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले होते.
परीनिर्वाण हे बौद्ध धर्मातील प्रमुख तत्वांपैकी एक तत्त्व आहे परीनिर्वाण चा अर्थ मृत्यूनंतरचे निर्वाण, बौद्ध धर्मानुसार जो व्यक्ती निर्वाण प्राप्त करतो तो संसारिक इच्छा आणि भ्रमांपासून मुक्त होतो.
अशा शब्दांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.
सदर कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्रा. नकुल गाडगे यांनी केले.




