प्रहार जनशक्ती पक्षाच्या तेल्हारा तालुका अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर आखरे व शेतकरी तालुका अध्यक्षपदी गोपाल घुंगड तर तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी संतोष गिऱ्हे यांची नियुक्ती !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय म. घोडे अकोला जिल्हा प्रतिनिधी
तेल्हारा :
अकोला जिल्ह्यामधील तेल्हारा तालुका येथे माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचा गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून खुप मोठा चाहता वर्ग आहे .त्याच तेल्हारा तालुक्यामध्ये आता नव्याने प्रहार जनशक्ती पक्षाची कार्यकारणी नुकतीच घोषित करण्यात आली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात व मा. बल्लू जवंजाळ कार्याध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने तसेच जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू राजेश पाटील खारोडे जिल्हा महासचिव व युवक जिल्हाध्यक्ष सुशील फुंडकर युवक जिल्हा उपाध्यक्ष भैया खारोडे यांच्या शुभहस्ते तेल्हारा तालूका अध्यक्ष पदी माळेगाव येथील रहिवासी ज्ञानेश्वर आखरे व शेतकरी आघाडी तालुका प्रमुख पदी गोपाल घूंगड , तालुका प्रसिद्ध प्रमुख पदि संतोष गिर्हे , युवक तालुका उपाध्यक्ष शिवा जोध , युवक प्रहार सचिव पदि ता अमित इंगळे व युवक प्रहार प. स. सर्कल प्रमूख पदि अनिकेत नेमाडे यांची नियूक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन निवड करण्यात आली. या जम्बो कार्यकारणी व नियुक्तीने संपूर्ण तेल्हारा तालुक्यात प्रहार सेवक व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तेल्हारा तालुक्यातील शेतकरी , दिव्यांग , शेतमजुर आदिंचे शासन दरबारी प्रलंबित असलेले प्रश्न ताकतीने सोडवण्याचा प्रयत्न करेल याबरोबरच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक वंदनीय बच्चुभाऊ यांच्या विचार धारेला मानणारा अपेक्षित युवा वर्ग तेल्हारा प्रहार जनशक्ती पक्षामध्ये सामील करण्याचा प्रयत्न व येणाऱ्या जिल्हा परिषद , नगर पालिकेमध्ये प्रहारच्या कर्तुत्वान कार्यकर्त्याला निवडून आण्याचा प्रयत्न सुद्धा करेन असे आवाहन प्रहार चे नवनिर्वांचित तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे व शेतकरी तालुका अध्यक्ष गोपाल घुंगड यांनी केले.



