गुन्हेगारीमहाराष्ट्रविदर्भ

गव्हाण येथे अज्ञात चोरट्याने नगदी व सोन्याचे दागिने मिळून सात लाख रुपयांचा मुद्देमाल नेला चोरून.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगाव: ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गव्हाण येथे घरातील सदस्य झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घरातील भिंतीवरून उडी मारून घरातील नगदी तीन लाख 95 हजार व सोन्याचे दागिने असा एकूण सहा लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकिस आली आहे. याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार नितेश पुंडलिक कंकाळे वय 43 राहणार गव्हाण तालुका शेगाव यांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आज तक्रार दिली की ते आणि त्यांच्या घरातील सदस्य गव्हाणे येथील घराच्या समोरील खोलीमध्ये झोपलेले होते अज्ञात चोरट्याने 15 मे च्या रात्री अकरा वाजे पासून 16 तारखेच्या पहाटे तीन वाजेच्या दरम्यान भिंतीवरून उडी मारून घरामागील किचनच्या दरवाज्याचे कडी कंडा तोडला व घरात प्रवेश करून लोखंडी कपाटा लॉकर व सुटकेसमध्ये ठेवलेले नगदी तीन लाख 95 हजार रुपये सोन्याचेच दागिने त्यामध्ये सोन्याची पट्टा पोत 45 ग्रॅम सोन्याच्या तीन अंगठ्या प्रत्येकी पाच ग्रॅम एक सोन्याची अंगठी तीन ग्रॅम सोन्याचे मनी मंगळसूत्र सोन्याचे कानातील झुमके किंमत अंदाजे तीन लाख 4 हजार रुपये असा एकूण सहा लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 457 380 बाधविनुसार गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर हे करीत आहेत. काही दिवसापूर्वीच गोलखेड येथे सुद्धा अशाच प्रकारची लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली होती एकाच आठवड्यात लागोपाठ दुसरी घटना घडल्याने शेगाव ग्रामीण क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरलेले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button