घोडसगाव ग्रामपंचायतीतील अस्वच्छतेचा प्रश्न तीव्र; नागरिकांच्या आरोग्याला धोका मुक्ताईनगर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
मुक्ताईनगर/ घोडसगाव
घोडसगाव ग्रामपंचायतीतील अस्वच्छतेचा प्रश्न तीव्र; नागरिकांच्या आरोग्याला धोकामुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून गावातील गल्लीबोळांमध्ये शेणाचे उकिरडे आणि कचरा साचलेला आहे. ग्रामपंचायतीकडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने गावात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे �.
गावातील स्वच्छतेच्या अभावामुळे मच्छर आणि डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून ताप, मलेरिया, कावीळ आदी आजार पसरू लागल्याचे स्थानिकांनी सांगितले. अनेक नागरिक, विशेषतः लहान मुले, या साथीच्या आजारांनी त्रस्त आहेत. आरोग्य विभागाकडे तसेच ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी नागरिकांची नाराजी आहे
स्थानिकांच्या मते, गटारींची स्वच्छता गेल्या चार महिन्यांपासून झालेली नाही. काही गटारींमध्ये पाणी साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. याच कारणामुळे परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. गावातील नागरिकांनी अनेक वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे लक्ष वेधले असले तरी ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली आहे
.दरम्यान, ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने स्वच्छता मोहीम राबवून गाव स्वच्छ ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच ग्रामपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे तत्काळ लक्ष देऊन योग्य उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.
महाराष्ट्र शासनाची आरोग्य सेवामहाराष्ट्र राज्य सरकार नागरिकांना दर्जेदार, प्रतिबंधात्मक आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. “निरोगी राज्ये, प्रगतीशील भारत” या नीती आयोगाच्या अहवालानुसार महाराष्ट्र हे आरोग्यविषयक कामगिरीत अव्वल राज्यांपैकी एक मानले गेले आहे.
राज्य शासनाने महिला व बालकांसाठी मोफत लसीकरण, गर्भधारणेनंतरच्या आरोग्य सुविधा आणि टेली मानस उपक्रमाद्वारे मानसिक आरोग्यासाठी मोफत सहाय्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. हे उपक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित आहेत



