बुलढाणा
अखेर ती मेलेली बकरी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळेच ठार झाल्याची शंका!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपूर प्रतिनिधी,
रतन भगत.
सविस्तर वृत्त असे की संग्रामपूर तालुक्यातील जास्त गाव शिवारात मोकाट वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जंगलात चरायला गेलेल्या एका बकरीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजता आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात व आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
जास्त गाव येथील रहिवासी राहुल वानखडे यांची बकरी नेहमीप्रमाणे शेती शिवारात चरण्यासाठी गेली होती मात्र सायंकाळपर्यंत ती बकरी घरी परत न आल्याने त्यांनी इकडे तिकडे शोधा शोध सुरू केली. यावेळी जास्त गाव शिवारातील एका शेतात ती बकरी वृत्ता अवस्थेत आढळून आली. वन्य प्राण्याने हल्ला करून बकरीचा जीव घेतल्याचे स्पष्ट झाले आहे मात्र या घटनेमुळे बकरीचा मालक राहुल वानखडे राहणार जास्त गाव यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र बकरीची शिकार नेमकी कोणत्या वन्य प्राण्याने केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र संग्रामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा संचार आढळल्याचे चित्र दिसत आहे



