Uncategorized

नाव मोठ लक्षण खोटं,,राहुरी नगर परिषदेचा कारभार चव्हाट्यावर

राहुरी प्रतिनिधी

राहुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राहुरी नगर परिषदेचे भव्य दिव्य असे डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरे व्यापारी संकुल आहे. या ठिकाणी पूर्वी राहुरी नगर परिषदेची कामगार कॉलनी होती. परंतु सदर जागेवर आज रोजी राहुरी नगरपरिषदेने भव्यदिव्य असे व्यापारी संकुल बांधले आहे. सदर व्यापारी संकुलामध्ये अंदाजे कमीत कमी ६० ते ७० गाळे आहेत. सदर सर्व गाळे राहुरी नगरपरिषदेने लिलावी पद्धतीने गाळेधारकांना चालवण्यासाठी दिले आहेत. सदर गळ्यामध्ये विविध स्वरूपाचे व्यवसाय चालतात. या व्यावसायिकांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात कर स्वरूपात आर्थिक स्वरूपाची प्राप्ती राहुरी नगर परिषदेला होत असते. परंतु आज रोजी हे गाळेधारक वेगवेगळ्या समस्यांनी त्रासले आहेत. सदर गाळेधारकांच्या सभोवतालचा परिसर अतिशय अस्वच्छ व घाणीचा आहे. येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले जाते परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी नेहमीच येत असते परंतु या बाबीकडे राहुरी नगर परिषदेचे प्रशासन नेहमीच काना-डोळा करते. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे व आरोग्य अधिकारी राजेंद्र पवार हे झोपेचे सोंग घेत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. सदर व्यापारी संकुलामध्ये असणारे स्वच्छतागृह हे अतिशय अस्वच्छ आहे त्यामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे टॉयलेटचे दरवाजा अक्षरशः निखळून पडले आहेत. गाळेधारकामध्ये असणारी मोकळी जागा, जिने, हे अक्षरशः घाणीने माखले आहेत. या गाळेधारकांमध्ये असणारे महिला व्यावसायिक गाळेधारक यामध्ये महालक्ष्मी साडी, ब्युटी झोन पार्लर, प्रतिभा ज्वेलरी, आशा ब्युटी पार्लर, स्वामिनी ब्युटी पार्लर, साक्षी टेलर या महिला व्यवसायिक आहेत या व्यापारी संकुलामध्ये नेहमीच महिला ग्राहकांची वर्दळ असते या मध्ये महिला गाळेधारक, महिला कर्मचारी,व महिला ग्राहक असे मिळून रोजची ४०० ते ५०० महिलांची या भागात ये-जा असते परंतु अस्वच्छ टॉयलेट व सुरक्षिततेच्या अभावी या सर्व महिलांना टॉयलेट साठी अक्षरशा या व्यापारी संकुलानाच्या टेरेसचा आधार घ्यावा लागतो. अशी खंत महिलांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांमध्ये राहुरी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे व आरोग्य अधिकारी राजेंद्र पवार यांचे विषयी मोठ्या प्रमाणात असंतोष व चीड निर्माण झाली आहे. हे अधिकारी महिलांच्या या समस्या कडे गांभीर्याने लक्ष देतील का? की नेहमीप्रमाणे रेड्याची कातडे घालून डोळा-झाक करतील अशी खमंग चर्चा या परिसरातील व्यापारी नागरिक व ग्राहक यामध्ये होताना दिसत आहे.

राहुरी शहर प्रतिनिधी: दत्ता जोगदंड

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button