समतेचे निळे वादळ संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष अँड. कुणालभाई वानखेडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मुक्ताईनगर :
समतेचे निळे वादळ संघटनेचे जळगाव जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष अँड. कुणालभाई वानखेडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यात सदैव पुढाकार घेणारे, तरुणांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे आणि संघटनेच्या माध्यमातून बहुजन समाजातील युवकांना दिशा देणारे अँड. वानखेडे यांना विविध क्षेत्रातून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
युवा नेतृत्व विकास, सामाजिक न्यायाची व्याख्या गावागावांत पोहोचवणे तसेच संघटनेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते, संघटनेचे पदाधिकारी, समर्थक आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण असून, अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अँड. कुणालभाई वानखेडे यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व सामाजिक चळवळीत अधिक यश लाभो, अशी कामना व्यक्त करण्यात येत आहे.



