बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

जळगाव जामोद पोलिसांची फार कौतुपास्पद मोलाची कारवाई; पत्नीच्या हत्तेसाठी पतीची सुपारी अपघाताचा बनाव उघडकीस!!!

 स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस 


प्रतिनिधी संग्रामपूर, 

रतन भगत.

  बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये कवठळ गावाजवळ झालेल्या एका दुचाकी अपघाता मागे सुपारी देऊन घडून आणलेला खून असल्याचे उघड झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीच्या हत्येसाठी स्वतः पतीनेच कट रचला असल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जामोद पोलिसांनी उघडकीस आणला असून या प्रकरणात तीन जणांना दोषी ठरवण्यात आलेले आहे. २ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे पावणे सात वाजताच्या सुमारास वृषाली प्रकाश गावंडे या आपल्या स्कुटीने पिंपळगाव काळे येथे शिक्षिकेचे कार्य करण्यासाठी जात असताना कवठळ गावाजवळ पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा एम एच २८ बीबी ५७५३ या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत वृषाली गावंडे या शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला सुरुवातीला हा अपघात असल्याचे समजत होते ,मात्र पोलिसांच्या तांत्रिक तपासातून हा नियोजित खून असल्याचे स्पष्ट झालेले आहे. जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेडगे यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज वाहनांची माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने तपास सुरू केला .तपासा दरम्यान संशयित वाहनाचा माग काढत पोलिसांनी मनीष नारायण सिंग सूर्यवंशी राहणार जगदंबा नगर शेगाव याला ताब्यात घेतले. कसून चौकशीत मन्या सूर्यवंशी याने वृषाली गावंडे यांची हत्या करण्याची सुपारी घेतल्याची कबुली दिली. तपासात पुढे असे समोर आले आहे. की या गुन्ह्यामागे मृत महिलेचे पती प्रकाश अनंता गावंडे आणि त्यांचा साथीदार मंगेश चुलता राहणार पातुर्डा हे मुख्य सूत्रधार आहेत .वृषाली गावंडे यांचा जीव घेण्यासाठी आरोपींनी यापूर्वी तीन वेळा अन्नातून विष देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो प्रयत्न फसल्याने शेवटी अपघाताचा बनाव रचत गाडीने धडक देऊन हत्या करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मनीष सूर्यवंशी याला एक लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले .या प्रकरणी वाहन चालक मनीष नारायण सिंग सूर्यवंशी मध्यस्थ मंगेश चुलकार आणि पती प्रकाश अनंता गावंडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता बी एन एस कलम १०३ (१) ६१(१) व ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या गुन्ह्याचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करत असून या प्रकरणातील इतर बाबींचा ही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.....

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button