खरीप पिक कर्जा पासून एकही शेतकरी वंचित राहू नयेः

आ राजेश एकडे
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
//////////////////////////////
नांदुराः शेतकऱ्यांना निर्धारित लक्ष्यांकाप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका व व्यापारी बँका मार्फत पुरेशा प्रमाणात व विहित वेळेत पीक कर्जपुरवठा करुन एकही शेतकरी खरीप पिक कर्जा पासून वंचित राहता कामा नये असे उद्गगार आमदार राजेश एकडे यांनी पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या तालुका कर्ज वाटप आढावा समीतीच्या बैठकीदरम्यान काढले
यावेळी तालुका स्तरावर बँकांना निर्धारित करून दिलेल्या लक्ष्यांकाप्रमाणे पीक कर्ज वितरणाचा व नव्याने शेतकऱ्यांना कर्ज घ्यावयाच्या कार्यवाहिचा आढावा घेण्यात आला
त्याचप्रमाणे बँकामार्फत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्ज तथा सवलतीच्या कार्यपद्धतीचे सुसूत्रीकरण व सुलभीकरण करणे यावर बैठकीत सांगोपांग चर्चा होऊन संबंधित बँकांना सूचना देण्यात आल्या
याप्रसंगी समीतीचे सदस्य सचिव सहायक निबंधक अविनाश सांगळे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले
या बैठकीला तालुका कृषी अधिकारी संदिप निमकर्डे यांच्यासह विविध बँकाच्या व्यवस्थापकांची प्रामुख्याने उपस्थिती होती



