बुलढाणामहाराष्ट्र
उष्म्यापासून मिळणार का दिलासा?.

उष्म्यापासून मिळणार का दिलासा?. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर कल्याण डोंबिवलीत उन्ह आणि घामानं लोक हैराण आहेत. आणखी काही दिवस हा उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. काल 10जून रोजी कल्याण – डोंबिवलीत कमाल तापमान 38 होते तर किमान तापमान 29 होते. तर आज 11जून रोजी कमाल तापमान 37 तर किमान तापमान 29 राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. दिवसेंदिवस ऊन वाढत चालले आहे तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



