खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरशैक्षणिक

‘एक पेड माँ के नाम 3.0’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; डॉ. जगदीश पाटील सीबीएसई स्कूलमध्ये 150 रोपांचे वाटप

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासोबतच मातांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश देणारा ‘एक पेड माँ के नाम 3.0’ हा उपक्रम मुक्ताईनगर येथील डॉ. जगदीश पाटील सीबीएसई स्कूलमध्ये उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या उपक्रमाअंतर्गत 150 वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वनपाल व्ही. के. बोराडे, वनरक्षक मयुर पाटील आणि वनरक्षक राम असुरे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक योगेश सोनवणे यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा जाधव यांनी प्रभावीपणे केले.

यावेळी मार्गदर्शन करताना वनरक्षक राम असुरे यांनी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. “आई ज्या मायेने आपल्या मुलांचा सांभाळ करते, त्याच प्रेमाने आपण लावलेल्या प्रत्येक रोपट्याची काळजी घेतली, तर पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक प्रभावी होईल,” असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी मुख्याध्यापक योगेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच निसर्गप्रेम, पर्यावरणाबद्दलची जाणीव आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना विकसित व्हावी, यासाठी शाळा सातत्याने अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य देत राहील, असा विश्वास व्यक्त केला.

शिक्षकवृंद व शाळेतील कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पुढील पिढीमध्ये वृक्षसंवर्धनाची संस्कृती रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button