रावेर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे थांबावरूण प्रवाशांचा संताप प्रवाशी नेते प्रशांत बोरकर यांची तिव्र भुमिका

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी विनोद तायडे
रावेर लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री पद असतांना देखील रावेर , सावदा : निंभोरा : भुसावळ : यांसारख्या भागातील प्रवाशांवर अन्याय सुरुच आहे नुकत्याच जाहीर झालेल्या रेल्वे थांब्यांच्या यादीत रावेर स्टेशन चा समावेश नाही यामुळे प्रवाशां मध्ये तिव्र नाराजी होत आहे तरी प्रशांत बोरकर ( प्रदेक्षाध्यक्ष – भारतीय किसान संघटन व ओबीसी जनकल्याण संघ प्रवाशी नेते – राष्ट्रीय जनता दल ) यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की ” रावेर च्या नागरीकांच्या तोंडाला पुन्हा एकदा पाणी पुसले गेले आहे लाखो प्रवाशी रोज रावेर : भुसावळ मार्गे पुणे : नागपूर : सुरतकडे जातात परंतु अजूनही रेल्वे थांबे मिळत नाही हे दुर्दैवी बाब आहे
प्रमुखे मुद्दे :
: रावेर रेल्वे स्टेशन वर एकही सुपरफास्ट गाडी थांबत नाही
लोकसभा मतदारसंघाचे नाव असुनही अन्याय होत आहे
: रेल्वे प्रशासनाने इतर ठिकाणी थांबे मंजूर केले असतांना रावेरचा विसर पडत असल्याचा आरोपही त्यांनी केला रावेर लोकसभा मतदारसंघाचे नाव असुनही मुलभुत सुविधा मिळत नसतील तर हा जनतेवरील अन्याय आहे ” असे ते म्हणाले बोरकर यांच्या मते / गेल्या ३५ वर्षापासून रेल्वेमंत्री जिल्हाधिकारी जीएम व डि आरएम कार्यालया कडे शेकडो निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला आहे तरी देखील ठोस निर्णय झालेला नाही परिणामी प्रवाशांना खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असुन आर्थिक भार वाढत आहे
रावेर च्या जनतेला संघर्ष करूण रेल्वे मिळवावी लागणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे



