खानदेशजळगावा जिल्हा

मूक्ताईनगर तालुका क्रीडा स्पर्धा सहविचार सभा संपन्न

मूक्ताईनगर तालुका क्रीडा स्पर्धा सहविचार सभा संपन्न……… मुक्ताईनगर

तालुका क्रीडा कार्यालय व पं.स . मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२५—२६ ची सहविचार सभा जे.ई.स्कूल & ज्यु.काॅलेज मुक्ताईनगर येथे संपन्न झाली. यात या वर्षी घेण्यात येण्यार्‍या तालुकास्तरीय दहा खेळांच्या नियोजन व आयोजन संर्दभात सभा घेण्यात आली. अध्यक्षस्धानी गटशिणाधिकारी वसंत मोरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन ता. क्रीडा अधिकारी नितीन जंगम, श्री किशोर चौधरी, प्राचार्य व्ही.एम. चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी संजय ठोसर, ता. क्रीडा संयोजक संजीव वाढे उपस्थित होते. या वेळी अध्यक्षीय भाषणात वसंत मोरे यांनी उकृष्ठ स्पर्धेचे अयोजन करुन स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडाव्यात असे आवाहन केले. प्रमुख पाहुणे नितीन जंगम यांनी क्रीडा कार्यालया मार्फत राबविल्या जाणार्‍या योजनां बद्दल माहीती दिली. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांच्या संकल्पनेतुन माझे क्रीडांगण — स्वच्छ क्रीडांगण असे अभियान राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य व्ही.एम. चौधरी यांनी खेळामुळे विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास होतो, विद्दार्थ्यी हा जास्तीत जास्त मैदानावर हजर राहुन खेळ खेळले पाहीजेत. ता. क्रीडा संयोजक संजीव वाढे यांनी खेळाडु आॅनलाइन नोंदणी, आॅनलाईन प्रवेशिका , प्रवेश फी या विषयी मार्गदर्शन केले. या वेळी नुकतेच सेवानिवृत्त झाले ले घोडसगाव येथील विद्यालयाचे पर्यवेक्षक क्रीडा शिक्षक के.एन.पाटील यांनातालुक्यातील क्रीडाशिक्षकांकडुन निरोप देण्यात आला. सुञसंचलन सुभाष गायकवाड यांनी केले. आभार अनिल चव्हाण यांनी मानले . यावेळी क्रीडा शिक्षक अमोल पाटील, दत्ताञय फेगडे, सुरेश मोरे, मनोज चौधरी, मुबीन शेख ,भगिरथ बिरलिंगे, मनिष चौधरी, एस.एस. कांडेलकर,देवेंद्र हिवाळे,एस.जे.उगले,एम.व्ही.बाणाईत,एन.एस.पाटील,वाय.ए.नेटके,एस.डी पाटील
उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी क्रीडा कार्यालयाचे प्रतिनिधी ज्ञानदेव येवले,किरण भंगाळे, सचिन भोळे यांनी परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button