बुलढाणा

कारची दुचाकीला धडक; १ गंभीर, गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव : खामगाव रोडने भरधाव वेगात येणाऱ्या कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना जिजामामाता चौकात १९ मे रोजी सायंकाळी ४. ३० वाजता सुमारास घडली. याबाबत प्रा. ललीत रमेश वर्मा वय २९, रा. बजाज शोरुमच्या मागे, खामगाव रोड, शेगाव यांनी पोलिसात तक्रार दिली की, ते जगदंबा चौकातून खामगाव रोडने बजाज शोरूम कडे होंडा अॅक्टीवा मोटार सायकल क्र. एम. एच. २८ए. क्यू. २९३४ने जात असतांना जिजामाता चौक येथे खामगाव रोड कडून येणाऱ्या कार चालकाने एकदम त्याचे ताब्यातील वाहन क्र एम. एच. २७डी. ए. ८४१० ही कार जिजामाता चौकातून भुतबंगला परीसरकडे जाणारे रस्त्याने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवून वळन घेत माझे मोटार सायकलला उजव्या बाजूने धडक दिली. त्यामूळे माझ्या उजव्या पायाला गंभीर मार लागला आहे तसेच गाडीचे १० हजाराचे नुकसान केले. याप्रकरणी कार मालक यांचे विरुद्ध अप नं २८१/२५ कलम २८१,१२५ (ए)३२४(४) भारतीय न्याय साहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक निलेश गाडगे करीत आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button