राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 साठी; प्रवीण जमधाडे यांची निवड….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
खामगाव : श्री अरजन खिमजी नॅशनल हायस्कूल, खामगाव येथील उपक्रमशील शिक्षक श्री प्रवीण जमधाडे सर यांची राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार 2026 साठी निवड झाल्याबद्दल त्यांना निवडपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने हा सन्मान जाहीर करण्यात आला असून शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले विविध उपक्रम तसेच समाजाभिमुख कामाची दखल घेऊन त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री प्रवीण जमधाडे सर यांना निवडपत्र देऊन पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षणप्रेमी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सन्मानामुळे खामगाव परिसरातील शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक व विद्यार्थ्यांनी श्री प्रवीण जमाधाडे सरांचे अभिनंदन केले आहे….



