जळगावा जिल्हापत्रकार

संत मुक्ताई मंदिरात गुरुवर्य नितीन दादा मोरे यांच्या हस्ते ‘मायेची सावली’ पुस्तक स्वीकार

मुक्ताईनगर प्रतिनिधी :–
संत मुक्ताई मंदिर, मुक्ताईनगर येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरु पीठाचे पीठाधीश प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे सुपुत्र नितीन मोरे यांच्या हस्ते ‘मायेची सावली’ या पुस्तकाचे सन्मानपूर्वक लोकार्पणात्मक भेट देण्यात आली. या पुस्तकाचे लेखक व पत्रकार छबिलदास पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून पुस्तक प्रदान केले.
‘मायेची सावली’ या पुस्तकातून पालकांच्या सेवाभावाचे महत्व, कुटुंबातील संस्कार आणि मुलांनी आपल्या आई-वडिलांप्रती करावयाचा आदरभाव यांचे हृदयस्पर्शी वर्णन करण्यात आले आहे. नितीन मोरे यांनी पुस्तक स्वीकारताना लेखक छबिलदास पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुस्तकातील विचार समाजासाठी उपयुक्त व मार्गदर्शक असल्याचे सांगितले.
या प्रसंगी संत मुक्ताई पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अमोल वैद्य, राजेश चौधरी, सचिन झणके, निलेश मेढे, रवी पवार, अक्षय काठोके यांसह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button