सरसंचालक डॉ. मोहनजी भागवत आज बुलढाणा जिल्ह्यात! कारण आहे”विशेष” पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आज, १९ नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यात येत आहेत. सरसंघचालक मोहनजी भागवत यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा असल्याने या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एस पी सुनील कडासने यांच्या देखरेखीखाली २ उपविभागीय पोलीस अधिकारी, १० पोलीस निरीक्षक, १० सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, १४२ पोलीस कर्मचारी, १० महिला पोलीस कर्मचारी यांच्यासह बंदोबस्तासाठी तैनात आहेत.
प्राप्त माहितीनुसार सरसंचालक डॉ. मोहनजी भागवत आज.१९
नोव्हेंबरला ४ वाजता संतनगरी शेगावात दाखल होतील. श्री संत गजानन महाराजांचे दर्शन आणि काही निवडक भेटीनंतर ते वाशिम कडे रवाना होणार आहेत. आज वाशिम येथे त्यांचा मुक्काम असून उद्या ते श्री क्षेत्र माहूरगडला दर्शनासाठी जाणार आहेत. अयोध्येत प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिराचा राष्ट्रपर्ण सोहळा जानेवारी महिन्यात आहे.




