गुन्हेगारीमहाराष्ट्रविदर्भ

पशु तस्करी रोखण्याचे पोलीसा समोर आव्हान.

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी – जी डी रोकडे

खामगाव पशु तस्करांना हिंगणा कारेगाव, तसेच निळेगाव, येथील गावकऱ्यांनी पकडून केले पोलिसांच्या हवाले. खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव निळेगाव शिवारात चरणाऱ्या देवगाय सोडून घेऊन जाणाऱ्या वाहना सह दोघांना नागरिकांनी पकडले असून ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली.यावरून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत पिंपरी गवळी येथील राजेंद्र रामदास बघे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रार म्हटले आहे .की चितोडा येथील शेख नजीर, शेख कबीर ,वय वर्ष 60 व शेख साजिद शेख लाल वय 23 या दोघांनी कारेगाव निळेगाव शिवारातील कॅनल मध्ये करत असलेल्या पांढऱ्या रंगाची देव गाय ही04 नंबर ९३५२ गाडीमध्ये नेत असताना नागरिकांनी त्यांना पकडले व मला फोन द्वारे माहिती दिली. घटनास्थळी येऊन राजेंद्र बघे यांनी ग्रामीण पो .स्टे. तक्रार दिली. या तक्रार यावरून ग्रामीण पोलीस स्टेशनने दोघां विरुद्ध कलम 379,34 भा.द.वी चा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे शिवाजी दळवी साहेब हे करीत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button