आमदार मनोज कायंदे यांच्या सूचनेनंतर देऊळगाव राजातील प्रलंबित शवदाहिनीचे काम मार्गी; मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्याकडून तत्परता.

नागरिकांची बहुप्रतिक्षित मागणी पूर्ण! देऊळगाव राजा शहरात नवीन शवदाहिनी कार्यान्वित; मुख्याधिकारी मोकळ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी शंकर शिवरकर
देऊळगाव राजा: येथील स्मशानभूमीमधील नवीन शवदाहिनीचे काम अखेर पूर्ण झाले असून, शहरातील नागरिकांची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली एक महत्त्वाची समस्या मार्गी लागली आहे. या अतिशय आवश्यक अशा कामाच्या पूर्णत्वामुळे स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील स्मशानभूमीमधील जुनी शवदाहिनी अत्यंत खराब अवस्थेत झाली होती. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी तात्काळ याची दखल घेतली व संबंधित प्रशासनाला हे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार देऊळगाव राजा पालिकेचे मुख्याधिकारी अरुणजी मोकळ यांनी आदेश जारी करत या कामाला गती दिली. तसेच नगराध्यक्ष माधुरीताई शिपने यांनीही यासाठी आवश्यक ते सहकार्य केले.
शहरातील नागरिकांची ही अनेक दिवसांची जुनी मागणी पूर्ण व्हावी, यासाठी संतोष खांडेभराड आणि सुनील शेजुळ यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळेच हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले.
हे अत्यंत संवेदनशील आणि गरजेचे काम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल देऊळगाव राजा शहरातील नागरिकांकडून मुख्याधिकारी अरुणजी मोकळ, लोकप्रतिनिधी आणि पाठपुरावा करणाऱ्या कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक व आभार मानले जात आहेत.



