जळगावा जिल्हामहाराष्ट्रशैक्षणिक

आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धांचा शुभारंभडॉ.धर्मेंद्र पाटील यांच्या गोलंदाजीवर डॉ. उल्हास पाटील यांनी टोलविला चेंडू

जळगाव – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर पायरेक्सीया २०२४ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धांचा आज शुभारंभ झाला. नेत्ररोग तज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केलेल्या गोलंदाजीवर माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी चेंडू टोलवित स्पर्धेला सुरूवात करून दिली. तसेच डीन डॉ. प्रशांत सोळंके यांनी देखिल जोरदार फलंदाजी करीत स्पर्धेच्या शुभारंभात रंगत आणली.
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित या क्रिकेट स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील ३२ संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा शुभारंभप्रसंगी माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन केले. तसेच या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नेत्ररोग तज्ञ तथा केशव स्मृती प्रतिष्ठानचे संचालक डॉ. धर्मेंद्र पाटील हे उपस्थित होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमकुमार पंडीत, आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, नर्सिंग महाविद्यालयाचे प्रा. पियुष वाघ, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते केक कापून आणि चषकाचे अनावरण करून स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. पहिला सामना लातूर विरूध्द बीएचएमएस महाविद्यालय जळगाव या संघांमध्ये खेळला गेला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button