तेल्हारा शहरामध्ये मुस्लिम बांधवांनी केली बकरी ईद

*तेल्हारा शहरामध्ये मुस्लिम बांधवांनी केली बकरी ईद
(ईद-उल-अजहा) साजरी* स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,व्ही.एम.घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधीतेल्हारा: दि. 29 जून 2023 गुरुवार रोजी तेल्हारा शहरांमध्ये बकरी ईद (ईद-उल-अजहा) सर्व मुस्लिम बांधवांनी हर्षोदित वातावरणामध्ये साजरी केली. सकाळी पाऊस सुरू असल्यामुळे शहराच्या ईदगाह मध्ये न जाता सर्वांनी मस्जिद मध्येच ईदची नमाज पठण केली. यावेळी जामा मस्जिद चे इमाम हाफीस झुबेर साहब यांनी ईदची नमाज पठण केल्यावर लोकांना बकरी ईद (ईद-उल-अजहा) चे महत्त्व सांगताना ते म्हणाले हा ईदचा सण त्याग, समर्पण व कर्तव्य भावनेची शिकवण देणारा सण आहे यावर्षी आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आले आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आनंदाने व भाईचाराने एकत्र राहतात तेव्हा आपणही दुसऱ्या धर्माच्या सणाचा सन्मान करून आपले सण साजरे करावे हे आपले कर्तव्य आहे असे उद्देशून म्हणाले शेवटी देशांमध्ये सुख शांती समृद्धी बहरत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली व सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या नंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकां ची गळा भेट घेऊन बकरी ईदच्या शुभेच्छा देत या वर्षीची हि ईद साजरी केली.



