खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

” अबकी बार 400 पार “

अंतूर्ली ता. मुक्ताईनगर येथे झंझावती प्रचार दौरा

मा. नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी रावेर लोकसभा मतदारसंघातील मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील अंतूर्ली येथे भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी घरोघरी जाऊन भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत भाजपचा प्रचार केला. सर्वप्रथम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून प्रचारास सुरुवात केली.
याप्रसंगी भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख अशोकभाऊ कांडेलकर, भाजपा तालुकाप्रमुख प्रफुल्ल जवरे, भाजपा शहरप्रमुख सुभाष दवंगे, भाजपा किसान मोर्चाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत महाजन, पंतप्रधान जनजागरण अभियानाचे मुनाफ सर, भाजपा तालुका उपाध्यक्ष अतुल महाजन, पंकज पाटील, सारंग पाटील, सुनील महाजन, सुनील मिस्त्री, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मिलिंद महाजन, भाजपा तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, भाजपा तालुका उपाध्यक्ष राजू सावळे, रिपाई आठवले गट उत्तर महाराष्ट्र प्रमुख रमेश मकासरे, माजी नगरसेविका लक्ष्मी मकासरे, किशोर चौधरी, सुधाकर पारक, अशोक लक्ष्मण महाजन, मनोज कुलकर्णी, पराग कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, शांताराम कापसे, संकेत ठाकूर, भाजपा तालुका चिटणीस विनोद पाटील, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सोपान झाल्टे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विशाल झाल्टे, विनायक पाटील, गणपत महाजन, कैलास महाजन, कैलास पाटील, सुनील लाखे, दिगंबर विटे, शोहेब खान, बापू महाजन, ईश्वर मिस्त्री, दिलीप कोळी, बूथ प्रमुख विशाल महाजन, भाजपा, शिवसेना शिंदे गट, रिपाई आठवले गट आणि मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्रचारादरम्यान नवनाथ मंदिर आणि महादेवाच्या मंदिराचे सुद्धा दर्शन घेतले. या प्रचारास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची माहिती देखील दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button