खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रविदर्भशैक्षणिक

गोदावरी स्कूलमध्ये सरदार वल्ल्भभाई पटेलयांना मॅरेथॉन रन फॉर युनिटीद्वारे अभिवादन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

रणधीर पवार

जळगाव – गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसीई स्कूल, जळगाव येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमत्‍त मॅरेथॉन रन फॉर युनिटीचे आयोजन करुन अभिवादन केले.
भारत हा संस्कृती, भाषा आणि परंपरांनी समृद्ध बहुसांस्कृतिक देश आहे. भारतातील एकता आणि अखंडतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ३१ ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित् साजरा केला जातो. त्यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ, एकता या आदर्शांना प्रोत्साहन देण्यासाठी गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, जळगाव येथे मॅरेथॉन रन फॉर युनिटी आयोजित केली गेली. यामध्ये स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन राष्ट्रीय एकता दिनानिमित्त, सांस्कृतिक, भाषिक, धार्मिक आणि परंपरांची विविधता व विविध भाषा, धर्म आणि परंपरा असूनही प्रत्येक भारतीय एकतेच्या समान धाग्याने बांधलेला आहे हे आपल्या या कृत्यातून दाखवून दिले. राष्ट्रीय एकता दिवसाला भारतीयांच्या हृदयात विशेष स्थान आहे. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मॅरेथॉन रन फॉर युनिटीला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी, सर्व विद्यार्थी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक, लोहपुरुष, सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या महान कार्याचे स्मरण केले.

आपला विश्वासू
राहूल कुलकर्णी,
जनसंपर्क अधिकारी,
गोदावरी फाऊंडेशन

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button