अतिवृष्टीमुळे नुकसान झालेत्या पूरग्रस्तांना मदत मिळावी –

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेत्या पूरग्रस्तांना मदत मिळावी – डिक्करजी.डी.रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी..)विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा । संग्रामपूर, दि. २६ । झाला आहे. गेल्या जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या महापुराने नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना आजपर्यंतही शासनाची मदत मिळाली नाही. त्यांना त्वरित मदत मिळावी ह्याकरीता विविध मागण्यांसाठी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर हे जळगाव (जा.) उपविभागीय कार्यालयासमोर येत्या ३१ ऑगस्ट पासून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी बुलढाणा व संबंधित अधिकाऱ्यांना २४ ऑगस्ट रोजी दिलेले आहे.निवेदनात नमूद केले आहे की, संग्रामपूर व जळगाव (जा.) तालुक्यात २२ जुलैच्या सकाळी अचानक ढगफुटी सदृस्य पाऊस झाल्याने नदीनाल्यांच्या महापुराच्या पाण्याने परिसिमा ओलांडल्याने नाल्यावरील बंधारे, शेत बांध फुटून मातीसह पूर्ण बंधारे वाहून गेले. विहिरी खचून गेल्या काही गाळाने भरून जमीनदोस्त झाल्या. शेतातील ठिबक स्प्रिंकलर आदी शेती उपयुक्त साहित्य, हजारो एकर जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे ४ ते ५ वर्ष ती योग्य वहितीसाठी शेती राहिली नाही नसल्याने शेतकरी हवालदिलगावात नदी नाल्यांचे पाणी गावात शिरल्याने घरांची पडझड झाली. घरातील अन्नधान्य कपडे सर्व साहित्य वाहन गेले आणि घरे नेस्तनाबुत झालीत. जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. काही जनावरांचा गाळात दबून मृत्यू झाला. तर काही जनावरे दूरवर वाहन गेली. याबाबत विविध प्रकारच्या ११ मागण्या रास्त असल्याने याचा गांभीयांने विचार करून पूरग्रस्तांना न्याय द्यावा. अन्यथा येत्या २८ ऑगस्ट २०२३ पासून जळगाव (जामोद) येथील उपविभाग अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी निवेदनातून दिलेला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व संबंधित मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार यांना पाठविल्या आहेत, अशी माहिती स्वाभिमानीचे प्रसिद्धी प्रमुख रोशन देशमुख यांनी दिली आहे…….



