अकोटमध्ये कावळधारी शिवभक्त मंडळांसह पोलीस बांधवांचा विशेष सत्कार

सा. आवाज न्यायाचा
प्रतिनिधी
अकोट | सोमवार दि. ७ सप्टें. २०२६ रोजी अकोट शहरातून अत्यंत उत्साहात निघालेल्या कावळधारी व शिवभक्त मंडळांच्या पालखी मिरवणुकी सह पोलीस रक्षकांचे हनुमान भजन मंडळ व नाथू बाबा मंडळ टाकपुरा अकोट यांच्या संयुक्त विद्यमाने भक्तिमय वातावरणात भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित सर्व शिवभक्त बंधू-भगिनींना फराळी चिवड्याचे वाटप करण्यात आले.
अकोट शहरातील ही भव्य मिरवणूक अत्यंत शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडली. परंपरेनुसार या मिरवणुकीचे विसर्जन श्री तपेश्वरी मंदिरात करण्यात आले. नाथू बाबा शिवभक्त मंडळ यामध्ये मा. नगरसेवक बादल अहिर
राजेश सु . कहार, सागर ता. गौर, राज वि. कहार, निखिल हि. कहार, आनंद अ.कहार, यांच्यासह सर्व शिवभक्तांनी कार्य केले. मिरवणूकी दरम्यान सहभागी सर्व मंडळाच्या अध्यक्ष व सचिव यांचा मंचावर सत्कार करण्यात आला. या ठिकाणी अनेक वर्षापासून फराळ वाटप करण्यात येते. फराळ वाटप समिती मध्ये हनुमान भजन मंडळाचे रजत अ. कहार, सुभाष प्र. गौर, गणेश ला. गौर, राजेश छो. कहार, मुकेश गें. गौर, कन्हैया ला.गौर, विजय र.नायक, मनीष ता.गौर ,राजू द.कहार, देविदास हे. गौर, पुरण चुं.गौर, धनराज चं.कहार, गोपी प्रे. गौर,विकी सागर प्र.गौर, पवन कहार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यांनी स्वयंस्फूर्ती ने कार्य केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.
पोलीस बांधवांच्या सेवेचा गौरव
शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र तत्पर असणाऱ्या पोलीस प्रशासनाचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.
मा. किशोरजी जुनघरे (पो. नि, अकोट शहर पो स्टे)
मा. अमोल माळवे (पो. नि., अकोला शहर सायबर पो. स्टे)
निलेश बारहाते (पो. उप.नि)
मिसाळ (पो. उप.नि)
, वैभव तायडे (पो. उप.नि) कु.आचल कैलास गौर यांचा ही या कार्यक्रमादरम्यान बी.एस.एफ पंजाब मध्ये नियुक्त झाल्याबद्दल सत्कार तसेच डॉ. विशाल इंगोले, दिलीप बोचे, अनंता मिसाळ, सुनील देठे यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाला मेलोडी ग्रुपचे अध्यक्ष योगेश वर्मा, कन्हैया गौर, हिम्मत दंदी, स्वप्निल आढे, कैलास बोरकुटे, यांची विशेष उपस्थिती लाभली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार संचालन शिक्षक कन्हैया गौर आणि प्रेम कहार यांनी केले. सदर कार्यक्रमाला अकोला ,नागपूर ,अमरावती ,परतवाडा ,अंजनगाव येथून बरेचसे मंडळी उपस्थित झाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे त्यांचे देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य या कार्यक्रमाला लाभले समाजातील प्रतिष्ठित नागरिकांकडून या कार्यासाठी आर्थिक सहाय्य लाभले. ज्यामुळे हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.



