आंतरराष्ट्रीयखानदेशजळगावा जिल्हा

रावेर लोकसभा अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील पुरग्रस्त गावांना; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट…

मागील २ दिवसापासून होत असलेल्या संततधार पाऊस व वादळी वाऱ्यांमुळेमुळे रावेर लोकसभा अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरातील अनेक गांवात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून उभ्या पिकांचे मोठे मोठे नुकसान झाले आहे. आज सदर काकोडा, बोरखेडा, राजुरा, जोंधणखेडा, हलखेडा, धुळे, चिंचखेडा खुर्द व कुऱ्हा इ. पुरग्रस्त गावांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी व समस्या समजून घेतल्या. बहुतांश भागात अजूनही पाणी साचलेले असून, अनेक गावांमध्ये घरांची पडझड, पशुधनाची हानी, धान्य व संसारोपयोगी साहित्याचे आणि दुकाने व ग्रामीण रस्त्यांचे नुकसान झाले आहे. तसेच काकोडा येथील किरण सवळे यांचा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाला असता त्यांच्या परिवाराची भेट घेतली.

शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध होईल तसेच नुकसानाचे पंचनामे तातडीनं पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनास आवश्यक निर्देश दिले आहेत.

याप्रसंगी यांच्यासह स्थानिक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी बांधव व तालुक्यातील संबंधित अधिकारी सोबत उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button