कृषीप्रधान संस्कृतीचं प्रतीक बैलपोळा उत्साहात, शेतकऱ्यांकडून सर्जा-राजाचा सण शेगाव तालुक्यातील बोंडगाव येथे पारंपरिक पद्धतीने साजरा

कृषीप्रधान संस्कृतीचं प्रतीक बैलपोळा उत्साहात, शेतकऱ्यांकडून सर्जा-राजाचा सण शेगाव तालुक्यातील बोंडगाव येथे पारंपरिक पद्धतीने साजरा
स्टार भारत लाईव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव म्हणजे बैलपोळा…यांत्रिकरणाच्या युगात शेतीतला बैलांचा सहभाग कमी झालाय…तरीही बळीराजाच्या जीवनात त्यांच स्थान कायम आहे… शेतक-याच्या जोडीनं शेतात राबणा-या या सच्चा मित्राचं गोडकौतुक करण्यासाठीच हा सण साजरा केला करण्यात आला…पोळ्याचे दोन दिवस बैलांसाठी विश्रांतीचे असतात.त्यांना न्हाऊ खाऊ घालून त्यांची रंगरंगोटी केली जाते….पुरणपोळी सारखा गोडधोड जेवणाचा नेवैद्य त्यांना दिला जातो. त्यानंतर वाजत-गाजत काही ठराविक बैलांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.तर अनेकांनी घरीच बैलपूजा केली.
यांत्रिकीकरणामुळे शेतीमधलं बैलांच महत्व कमी झालंय. तरीही अनेक शेतक-यांना मशागतीसाठी आजही बैलांवरच अवलंबून राहवं लागतं. उन्हातान्हाची पर्वा न करता शेतात राबणा-या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा…शेगाव तालुक्यातील बोंडगाव येथे आज बैलपोळा लंपी या आजारामुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला…गर्दी होणार नाही यासाठी विशेष काळजी शिवसेना शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांनी घेऊन काही ठराविक बैलांचीच पूजा मान्यवरांनी केली…तर अनेकांनी आपल्याला घरीच बैलांची पूजा करून बैलपोळा सण साजरा केला.



