Uncategorizedबुलढाणा

माटरगावात येथी पैशाच्या वादातून चुलत भावाची हत्या दोन महिला गंभीर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे आज पैशाच्या वादातून खुनी थरार झाल्याची घटना समोर आली आहे. चुलत भावाने कुन्हाडीने बार करून भावाची हत्या केली असून दोन महिलांना गंभीर रित्या जखमी केले आहे. जखमी महिलांना उपचारासाठी अकोला हलविण्यात आले आहे.

माटरगाव येथील शत्रुघ्न मिरगे व भास्तन येथील त्यांचा चुलत भाऊ सोपान मिरगे यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून पैशाच्या कारणावरून बाद धुमसत होता. दरम्यान शत्रुघ्न मिरगे हे पत्नी व सालीसह आज दुपारी माटरगाव येथील बाजारात गेले होते, यावेळी त्यांचा चुलत भाऊ सोपान मिरगे याने तेथे येऊन त्यांच्याशी पुन्हा त्याच कारणावरून वाद घातला व शत्रुघ्न मिरगे यांच्यावर कुन्हाडीचे सपासप वार केले. यावेळी भांडण आवरण्यासाठी गेलेल्या शत्रुघ्न मिरगे यांच्या पत्नी राणी मिरगे व साळी मोनाली भागवत चेंडाळणे यांनाही सोपान मिरगे याने कुन्हाड़ी ने मारहाण केली. भर दुपारी गर्दीच्या बाजारात घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली. यावेळी नागरिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शत्रुघ्न मिरगे व इतर दोन महिलांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून शत्रुघ्न मिरगे यांना मृत घोषित केले तर या हल्ल्यामध्ये गंभीरित्या जखमी झालेल्या राणी मिरगे च मोनाली चेंडाळणे यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून वृत्त लिहेपर्यंत पुढील पोलीस कारवाई सुरू होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button